Tanaji Sawant | धाराशिवमध्ये मतदान मशीनमध्ये धनुष्यबाण नसला तरी अर्चना पाटलांसाठी जीवाचे रान करणार

Tanaji Sawant | धाराशिव हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र, तरी देखील महायुतीकडून येथून राष्ट्रवादीला उमेदवारी देण्यात आली. मात्र, माझा धाराशीवच्या जानेतेवर पूर्ण विश्वास आहे. कारण तिकीट देणारे नेते असले तरी पण मत देणारी ही आमची मायबाप जनता आहे. यांच्या जोरावर आम्ही निवडून येत असतो, असा शब्दात पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप नेते राणा जगजितसिंग पाटील, बसवराज पाटील यांच्यासह  महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना तानाजी सावंत म्हणाले, धाराशिव लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या वतीने 26 जानेवारी 2024 पासूनच प्रचाराला सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर धाराशिव मधील अनेक नेते, आमदार, मुख्यमंत्री ,दोन उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी मिळून येथील उमेदवार निवडला मात्र तरी देखील हा हाडाचा शिवसैनिक खचला नाही. कोणत्याही जय पराजयाने खचणारा हा शिवसैनिक नाही.  म्हणूनच आज पर्यंत धाराशिव जिल्हा हा कडवट शिवसैनिकांचा म्हणून ओळखला जातो. कोणापुढेही झुकणार नाही असा हा शिवसैनिकांचा बाणा आहे. शिवसैनिका पेक्षा कोणतेही पद मोठे नाही हे बाळासाहेबांची एक शिकवण आम्हाला आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत धाराशिवमध्ये मतदान मशीन मध्ये धनुष्यबाण नसला तरी आम्ही प्राणपणाने महायुतीच्या उमेदवारांसाठी जीवाचे रान करणार आहोत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील – चंद्रकांत पाटील

Shirur LokSabha | “मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे”, आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर

Sunetra Pawar | केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार; सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन