भोंग्याच्या विषयामुळे हिंदुत्व बदनाम होत आहे, हे एक ढोंग आहे – संजय राऊत  

मुंबई –  मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.  ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर देशात जिथं नमाज वाजेल तिथं हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

नेक मुस्लीम संघटनांनी (Muslim organizations) आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी राज ठाकरेंच्या विधानाचा विरोध केलाआहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात दंगल घडवण्याच्या हेतूने भोंग्याचे राजकारण केले जात आहे असा आरोप मविआचे नेते करत आहे. त्यामुळे राज्यात भोंग्यांचे राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, असध्या हिंदुत्वाच्या नावावर जो काही राजकीय भोंग्यांच्या विषय सुरु आहे, हे एक ढोंग आहे. हे ढोंग फार काळ चालणार नाही. यामुळे हिंदुत्व बदनाम होत आहे. हिंदुत्वाविषयी लोकांच्यामध्ये शंका निर्माण होत आहेत. भोंग्यांच्यासंदर्भात पंतप्रधान मोदींना आवाहन आहे की त्यांनी देशभरासाठी राष्ट्रीय धोरण निश्चित करावं. दिशानिर्देश द्या, कायदा करा सगळ्यात आधी या भोंगा बंदीची सुरुवात बिहारपासून सुरु करा, असं शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Shiv Sena MP and spokesperson Sanjay Raut) म्हणाले.

ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.भोंग्याचा वाद भाजपनं निर्माण केला आहे. आम्हाला कुणीही भोंग्यांबाबत अक्कल शिकवू नये. मुस्लिमांबाबतचे प्रश्न बाळासाहेबांनी चर्चेतून सोडवलेत, असं संजय राऊत म्हणाले. भोंग्यांच्यासंदर्भात राष्ट्रीय धोरण निश्चित करा. त्याची सुरुवात भाजपशासीत राज्यातून करा, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.