‘टोपे साहेब … विश्वासघाताने मिळवलेली सत्ता टिकवायची म्हणजे थोडं सहन करायलाच हवं ना?’

मुंबई – महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. कारण औरंगाबादेत ( Aurangabad ) काल झालेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांच्या समक्ष आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शिवसेनेचे (Shivsena) मंत्री संदीपान भुमरे ( Sandipan Bhumre ) आणि सत्तार यांचे नाव घेत हे दोघेही राष्ट्रवादीच्या ( NCP ) पदाधिकाऱ्यांना धमकावत आहेत, फोडाफोडी करत आहेत, असा आरोप केला आहे.

सोमवारी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि राजेश टोपे ( Rajesh Tope ) औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादीच्या शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांकडून वाईट वागणूक मिळत असल्याचा आरोप केला. तर शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांना फोडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं टोपे म्हणाले होते.

दरम्यान, आता या घडामोडीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेस कडे आहे टोपे साहेब. आणि विश्वासघाताने मिळवलेली सत्ता टिकवायची म्हणजे थोडं सहन करायलाच हवं ना?असा टोला त्यांनी टोपे यांना लगावला आहे.