राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला मिळू लागला हिंदू संघटनांचा पाठींबा

औरंगाबाद – मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर देशात जिथं नमाज वाजेल तिथं हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

दरम्यान, अनेक मुस्लीम संघटनांनी (Muslim organizations) आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी राज ठाकरेंच्या विधानाचा विरोध केलाआहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात दंगल घडवण्याच्या हेतूने भोंग्याचे राजकारण केले जात आहे असा आरोप मविआचे नेते करत आहे. त्यामुळे राज्यात भोंग्यांचे राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, एकीकडे मनसेने राज ठाकरेंच्या सभेसाठी तयारी सुरु केली असताना दुसरीकडे विरोध केला जात आहे. काही संघटना दररोज पोलीस आयुक्तांना भेटून राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये अशी निवेदनं देत आहेत आहे. काल दिवसभरात पाच संघटनांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारावी असं निवेदन दिलं. वंचित बहुजन आघाडी , प्रहार संघटना, मौलांना आझाद विचार मंच , गब्बर ॲक्शन संघटना, ऑल इंडिया पँथर सेना या संघटनांनी या सभेला आपला विरोध दर्शविला आहे.

दरम्यान, एका बाजूला या सभेला विरोध होत असताना आता राज ठाकरे यांना हिंदुत्ववादी संघटना पाठींबा देऊ लागल्या आहेत. हिंदू रक्षक धर्म परिषदेने राज ठाकरे यांना आपला पाठींबा दर्शविला आहे. र्म परिषदेचे हजारो कार्यकर्ते राज साहेबांच्या सभेस येणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.