संजय राऊत यांचं मुंबईत जंगी स्वागत; गजा मारणेच्या जंगी स्वागताचा दाखला देत मुनगंटीवार म्हणाले,…

मुंबई – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत (sanjay raut) दिल्लीत होते. याचदरम्यान संजय राऊतांच्या मालमत्तांवर ईडीनं टाच आणली. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या राजकारणात खळबळ उडाली असून यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. खुद्द शरद पवारांनी (sharad pawar) देखील बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन अनेक मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर आता संजय राऊतांचे जोरदार स्वागत मुंबई विमानतळावर करण्यात आले.

विमानतळावर शिवसेनेचे आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिवसैनिकांनी यावेळी ढोल ताशा वाजवत राऊतांचं स्वागत केलंय. खरतर संजय राऊत याचं हे अशा पद्धतीने का स्वागत केले गेले हा अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता मात्र यामागे शिवसेनेला केवळ शक्तिप्रदर्शन करायचं होतं असं दिसतंय. दरम्यान,  दरम्यान, भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांकडून यावेळी गजा मारणेची ( Gaja Marne ) आठवण काढण्यात आली.

ते म्हणाले, पुण्यात गजानन मारणे नावाचा गुंड होता, तो सुटल्यानंतर त्याचं जंगी स्वागत झालं, म्हणजे तो काही आदर्श पुरुष आहे का? प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला सांगायाचं तू गजानन मारणेच हो, हे सांगण्यासारखं आहे? अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांच्या स्वागतावर खोचक शब्दात टीका केलीय.