इथून पुढे  25 वर्ष भाजपची सत्ता येणार नाही; मुंबईत पोहोचताच संजय राऊत यांची डरकाळी 

 मुंबई – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत (sanjay raut) दिल्लीत होते. याचदरम्यान संजय राऊतांच्या मालमत्तांवर ईडीनं टाच आणली. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या राजकारणात खळबळ उडाली असून यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. खुद्द शरद पवारांनी (sharad pawar) देखील बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन अनेक मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर आता संजय राऊतांचे जोरदार स्वागत मुंबई विमानतळावर करण्यात आले.

विमानतळावर शिवसेनेचे आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिवसैनिकांनी यावेळी ढोल ताशा वाजवत राऊतांचं स्वागत केलंय. खरतर संजय राऊत याचं हे अशा पद्धतीने का स्वागत केले गेले हा अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता मात्र यामागे शिवसेनेला केवळ शक्तिप्रदर्शन करायचं होतं असं दिसतंय. दरम्यान,  मुंबईत विमातळावर आल्यावर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजपावर जोरदार घणाघात केला. हे समर्थन किंवा शक्तीप्रदर्शन नाही ही शिवसेना आहे. हा लोकांच्या मनातील चीड आणि संताप आहे.असं ते म्हणाले.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या (central investigation team) माध्यमातून हल्ले केले जात आहेत. ते काय करू शकतात? ते आम्हाला तुरुंगात पाठवतील, माझी तयारी आहे. आमच्यावर खुनी हल्ला करा, आमची तयारी आहे. आम्हाला ठार केलं तरी आमची तयारी आहे. या पुढे 25 वर्ष तुमची सत्ता येणार नाही याची व्यवस्था तुम्हीच करून ठेवली आहे. तुम्हीच तुमचती कबर तुम्हीच खोदली आहे. अशा प्रकारचं वर्तन सुरूच राहिलं तर ही कबर सुद्धा देशात खोदली जाईल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपला दिला.