‘मराठा आणि कुणबी वेगळे, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र नको’, नारायण राणे यांचा दावा

Narayan Rane On Maratha Reservation: महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी १० दिवस दिले आहेत. राज्य सरकारने संपूर्ण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि त्यांना सरसकट आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. परंतु केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी याचा विरोध केला आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. मला त्या वादात जायचं नाही. मी एवढंच म्हणेन की मराठा आणि कुणबी यात फरक आहे. जरांगे पाटील म्हणतात की ते एकच आहेत. पण, ते एकच नाही. त्यांनी जातीचा अभ्यास करावा. घटनेचा करावा, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलंय.

शहाण्णव कुळे मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा आहे. त्यांना सरसकट प्रमाणपत्र द्यावं अशी त्यांची मागणी आहे. पण, सरसकट नको. कोणत्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र पाहिजे? कुठल्या मराठ्यांना पाहिजे सरसकट आरक्षण? कोणता मराठा हा कुणबी दाखला घेईल. कुणी घेणार नाही. मी कधीच आयुष्यभर कधीच कुणबी मराठा प्रमाणपत्र घेणार नाही, असेही नारायण राणे म्हणाले.

https://youtu.be/tr2tvuJfQq4?si=M8a1sEkkAwwC09hl

महत्वाच्या बातम्या-

सत्य विरुद्ध सत्ता च्या लढाईसाठी राष्ट्रवादी सज्ज; शरद पवारांनी घेतला सात लोकसभा मतदार संघाचा आढावा

ललितने सात किलो चांदी न नेता फक्त पंचवीस लाख रुपयांची रोख रक्कम नेत केले पलायन ?

शरद पवार सुप्रिया सुळे यांना हमासच्या बाजूने लढण्यासाठी गाझाला पाठवतील – सरमा