सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापिका होणार JNU च्या पहिल्या महिला कुलगुरू!

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापिका शांतीश्री धुलीपुडी पंडित यांची जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), दिल्लीच्या नवीन JNI कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जेएनयूच्या त्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. याआधी त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक होत्या. शांतीश्री धुलीपुडी पंडित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राजकारण आणि लोकप्रशासन विभागात प्राध्यापक आहेत.

शिक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पंडित या जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरू असतील आणि त्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी असेल. पदभार स्वीकारल्यापासून पंडित यांची JNU चे 13 वे कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शांतिश्री धुलीपुडी, या जेएनयूच्या १३ व्या कुलगुरू होणार आहेत. पंडित या प्राध्यापक एम. जगदेश कुमार यांच्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अध्यक्षपदी नियुक्त होणार आहे. जेएनयूच्या कुलगुरूपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ गेल्या वर्षी पूर्ण झाल्यापासून एम जगदेश कुमार हे कार्यवाहक कुलगुरू म्हणून जबाबदारी पार पाडत होते.