छत्रपतींंच्या वंशजांकडे पुरावे मागणारे आता वाघ नखांचेही पुरावे मागू लागले?

Aditya Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) अफजलखानाचा वध करताना जी वाघनखं (Wagh Nakhe) वापरली ती वाघनखं महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. येत्या 16 नोव्हेंबरला ही वाघ नखं मुंबईत दाखल होतील. पण ही वाघनखं शिवरायांची नाहीतच असा दावा काही मंडळी करत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखे भारतात येणार आहेत, पण ही वाघनखे येण्याआधीच राजकीय वादळ उठले आहे. शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांची ही वाघ नखे खरी आहेत का? त्यांनी ती खरंच वापरली होती कां? असा सवाल करत आक्षेप घेतला आहे. त्याला उत्तर देताना भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी कवितेच्या माध्यमातून ठाकरेंना (Ashish Shelar On Aditya Thackeray) फटकारले आहे.

आशिष शेलार यांची मार्मिक कविता

वाघ नखे येणार कळताच, इथले नकली वाघ का बिथरले?
छत्रपतींंच्या वंशजांकडे पुरावे मागणारे
आता वाघ नखांचेही पुरावे मागू लागले?

आम्हाला शिवकालीन जे जे सापडेल ते ते सारे प्रिय
छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती सुद्धा आम्हास वंदनीय

इथे हळूहळू हळूहळू औरंगजेबी वृत्ती मात्र डोकं वर काढतेय?
महाराजांच्या पराक्रमाचेच इथे पुरावे मागतेय?

आदू बाळाने शाळेतील पुस्तक सोडून अन्य काही वाचलेय का?
यांना वाघ नख टोचतात आणि पेंग्विन घेऊन हे गावभर नाचतात?

अहो, पब मधला थरथराट बाहेर असा कोण करतो का?
अफझलखान तुमचा कोण पाहुणा लागतो का?

महत्वाच्या बातम्या-
रोहित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्त महाविद्यालात होणार चक्क लावणीचा कार्यक्रम?

बाराही महिने चालणारे व्यवसाय, दर महिन्याला तगडी कमाई करुन देऊ शकतात ‘हे’ व्यवसाय

Bed Bugs: ढेकणांना त्रासलाय? ‘हे’ घरगुती उपाय करुन एका दिवसात पळवून लावा ढेकूण