‘आम्ही देखील छत्रपती शिवरायांच्या भूमीत जन्माला आलोय सेनेला जशास तसे उत्तर देऊ’

म्हापसा : माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुण्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा तीवर निषेध नोंदविला आहे. यावरून त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘आम्ही देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत जनमाला आलेलो आहोत जशाच तस उत्तर निश्चित दिलं जाईल’. असा थेट इशाराच सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. ते आज गोव्याच्या म्हापश्यात भाजप उमेदवार जोशुआ डिसोजा यांच्या प्रचारासाठी आले होते त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.

‘सरकार आणि मुख्यमंत्री कायदा पळत नसतील तर याचा अर्थ सरळ आहे, ही महाविकास आघाडी आहे की गुंडांची आघाडी आहे. त्यांना झुंडशाही पदतीने राज्य चालवायचं आहे. राज्याच्या प्रश्नाचं काही देणंघेणं नाहीये. किरीट सोमय्या हा लढाऊ माणूस आहे. तुम्ही कितीही तुमचं पाप झाकण्याचा आता प्रयत्न केला तर एक निश्चित आहे वाघ आता पिंजरातील वाघ झाला आहे. जनता याच योग्य उत्तर देईल आणि थोड्याच दिवसांत आपल्याला महाराष्ट्रात देखील सत्ता बदल झालेला दिसेल. पण एक लक्षात ठेवावं ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी, आम्ही देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत जनमाला आलेलो आहोत जशाच तस उत्तर निश्चित दिलं जाईल’. असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुणे महापालिकेच्या आवारात शिवसैनिकांकडून जोरदार धक्काबुक्की करण्यात आली होती. किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी सोमय्या पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जात होते. त्यावेळी काही शिवसैनिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तसंच सोमय्या यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्नही झाला. त्यामुळे सोमय्या यांना त्या ठिकाणावरून काढता पाय घ्यावा लागला होता.

किरीट सोमय्या हे पुणे महापालिका परिसरात असतानाच काही शिवसैनिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसंच सोमय्या यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्नही काही शिवसैनिकांनी केला त्यातच महापालिका इमारतीच्या पायऱ्यावरून सोमय्यांचा तोल जाऊन ते खाली कोसळले. इतकंच नाही तर सोमय्या यांच्या गाडीपुढे काही शिवसैनिक आडवे पडले.