India vs Bharat: टीम इंडियाच्या जर्सीवर ‘भारत’ लिहिण्याची सेहवागची मागणी; म्हणाला, ‘इंडिया’ हे नाव ब्रिटिशांनी दिले

Virender Sehwag On India: भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) विशेष मागणी केली आहे. त्यांनी भारतीय संघाच्या जर्सीवर ‘INDIA’ ऐवजी ‘भारत’ लिहिण्यास सांगितले आहे. सेहवाग म्हणाला की, India हे नाव ब्रिटिशांनी दिले आहे.

सेहवागने ट्विटरवर, “माझा नेहमीच विश्वास आहे की नाव असे असले पाहिजे जे आपल्यामध्ये अभिमान निर्माण करेल. आम्ही भारतीय आहोत, India हे ब्रिटीशांनी दिलेले नाव आहे आणि आमचे मूळ नाव ‘भारत’ परत मिळण्यास बराच वेळ लागला आहे. मी बीसीसीआय आणि जय शाह यांना विनंती करतो की या विश्वचषकात आमच्या खेळाडूंच्या छातीवर भारत असेल.”

सेहवागने अनेक उदाहरणे दिली
सेहवागने पुढे लिहिले की, “1996 विश्वचषकात नेदरलँड्स हॉलंडच्या रूपात विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आले होते. जेव्हा आम्ही त्यांच्याविरुद्ध 2003 मध्ये खेळलो तेव्हा ते नेदरलँड्स होते आणि आता त्यांचे नाव सारखेच आहे. बर्माने ब्रिटीशांनी म्यानमारला दिलेले नाव बदलले आहे आणि इतर अनेक त्यांच्या मूळ नावांवर परत गेले आहेत.”