महायुतीत कुरघोडी; ‘शिवसंग्राम’ युवक आघाडीला राष्ट्रवादीने पाडले खिंडार 

उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाले जाहीर प्रवेश

UdayKumar Aher-  ‘शिवसंग्राम‘च्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

प्रसिद्धी पत्रकानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात शिवसंग्राम संघटनेचे प्रदेश सरचिटणीस ॲड. विजय कातोरे, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा वैशाली जवजांळ, भूमीपूत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –