Shah Rukh Khan | शाहरुख खान मुलाला वाचून दाखवायचा ‘महाभारत’; म्हणाला ‘कथेमध्ये बदल करायचो कारण…’

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) एक थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 2017 सालचा असून या व्हिडिओमध्ये शाहरुख प्रेस कॉन्फरन्समध्ये गेल्या दीड वर्षांपासून महाभारत वाचत असल्याचं सांगत आहे. इतकंच नाही तर व्हिडीओमध्ये तो आपला लहान मुलगा अबराम यालाही महाभारताच्या कथा कथन करत असल्याचंही ऐकायला मिळत आहे, पण थोड्या बदललेल्या पद्धतीने. आता प्रश्न पडतो की शाहरुख महाभारतातील बदललेल्या कथा अबरामला का सांगतो? यावर शाहरुख काय म्हणाला वाचा.

शाहरुख मुलाला महाभारताच्या कथा का सांगतो?
शाहरुख खान 2017  (Shah Rukh Khan) मध्ये ईदच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाला होता, “माझ्या आई-वडिलांनी मला प्रत्येक धर्माबद्दल सांगितले आहे. मी जेव्हाही रामलीलाला जायचो तेव्हा माझे पालक आनंदी असायचो आणि जेव्हाही मी ईदला जायचो तेव्हाही ते आनंदी असायचे. माझ्या पालकांप्रमाणेच मी माझ्या मुलांना सर्व धर्मांबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतो.”

इस्लामच्या कथांबद्दल शाहरुख काय म्हणाला?
शाहरुख पुढे म्हणाला, “मी गेल्या दीड वर्षांपासून महाभारत वाचत आहे कारण मला कथा खूप आवडतात. मी अब्रामलाही सांगतो. होय! त्याला मजा येईल म्हणून मी कथा थोडी बदलून सांगतो. त्याचप्रमाणे मला इस्लामबद्दल ज्या काही कथा माहित आहेत, त्या मी मनोरंजक पद्धतीने कथन करतो. आशा आहे की माझी मुले सर्व धर्मांकडून शिकतील आणि त्यांचा आदर करतील.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप