शिवसेनेचे आमदार फुटणार हे शरद पवार यांना आधीच माहीत होतं; अजित पवारांच्या दाव्याने खळबळ 

पुणे : राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition Leader Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेनेत बंड होणार हे शरद पवार यांना माहीत होतं. त्याबाबतची माहिती त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली होती, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार यांनी केल्या या दाव्याने नवी चर्चा सुरु झाली आहे.

पुण्यात एका मुलाखती दरम्यान अजित पवार यांनी शिवसेनेचे आमदार का फुटले? याची माहिती दिली. आमदार फुटणार असल्याची महिती उद्धव ठाकरेंना दोन, तीन वेळा दिली होती शरद पवार साहेबांनी फोन करुन उद्धव ठाकरेंसोबत मीटिंग केली होती. पण माझ्या आमदारावर माझा विश्वास आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण स्वत: पक्ष नेतृत्वाने आपल्या आमदारांवर डोळे झाकून विश्वास टाकला. तिथेच खरी गफलत झाली, असं अजित पवार म्हणाले.

या सगळ्या गोष्टी घडू दिल्या गेल्या… आमदारांना खुशाल जाऊ दिलं गेलं… तिकडे हे व्हायला नको होतं… मी स्वतः उद्धवजींना सावध केलं होतं. पण ते बोलले की मी बोलन एकनाथ शिंदेंशी. तो आमचा पक्षांतर्गंत मामला आहे असं उत्तर त्यांनी दिलं, असंही त्यांनी सांगितलं.