सत्यजित तांबे यांच्या दणदणीत विजयानंतर लेकीचा आनंद गगनात मावेना, कौतुकाने म्हणाली…

नाशिक- संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा (Nashik Graduate Constituency Election) निकाल अखेर समोर आला आहे. काँग्रेसशी बंडखोरी करणाऱ्या अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyjeet Tambe) यांनी नाशिकमध्ये विजयाचा गुलाल उधळला आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना जवळपास ३० हजार मतांच्या मोठ्या अंतराने पराभूत केले आहे.

भाजपाचा पाठिंबा असलेले सत्यजित तांबे यांचे पारडे पहिल्या फेरीपासूनच जड होते. पाचव्या फेरीअखेर सत्यजित तांबेंनी एकूण ६८ हजार ९९९ मतं मिळवली आहेत. तर शुभांगी पाटील यांना केवळ ३९ हजार ५३४ मतांवर समाधान मानावं लागलं आहे. अशाप्रकारे शुभांगी पाटील यांचा तब्बल २९ हजार ४६५ मतांनी  दारूण पराभव झाला आहे. परिणामी सत्यजित तांबेंच्या विजयाने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, सत्यजित तांबे यांच्या या विजयाचे लेक अहिल्याने तोंडभरुन कौतुक करत मला माझ्या बाबांचा खूप अभिमान वाटतो. तेच माझे सुपरहिरो आहेत अशी प्रतिक्रिया अहिल्या हिने दिली. ती म्हणाली, मी खूप खुश आहे. माझ्या बाबांचा मला अभिमान वाटतो. ते खूप चांगले काम करतात. माझे बाबा खूप हार्डवर्क करतात. आणि तेच माझ्यासाठी सुपरहिरो असल्याचे तिने यावेळी म्हटले.

https://youtu.be/X_lsi1Lbh_w