हा आमच्या घरातील प्रश्न होता; वारस तयार करता आला नाही म्हणणाऱ्या राऊतांवर संतापले शरद पवार

मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांना आपला वारस तयार करता आला नाही. त्यात ते अपयशी ठरले आहेत, असं दैनिक ‘सामना’च्या कालच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं होतं. आता यावर शरद पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांची शाळा घेतली आहे.

सामना’च्या अग्रलेखातून काय लिहितात त्याला आम्ही महत्त्व देत नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना सुनावले आहे. आम्ही पक्षात काय करतो ते राऊतांना माहिती नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.

आम्ही काय केलं हे त्यांना माहीती नाही. आमच्या घरातील हा प्रश्न होता. मते वेगवेगळी येत असतात. पण आम्ही घरात बसून निर्णय घेतो. तसेच राजकीय भाष्याचा काहीही परिणाम होईल, असं वाटत नाही. आम्ही कर्नाटकमध्ये शून्यापासून सुरुवात केली आहे. त्यामुळे आम्ही कोणाशी बोललो नाही, असे शरद पवार म्हणाले.