मी जरांगेला पाटील म्हणणार नाही, कारण त्याच्याकडे पाटील पदासाठी काहीच नाही; कुणी केलं असं वक्तव्य?

मराठा समाजाच्या (Maratha society) आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे सोबती अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांच्या वक्तव्यामुळे मराठा संघटनेत फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे. मधल्या काळात अंतरवालीत घटना घडली आणि मी आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झालो. मराठवाड्यात ओबीसी नोंदींसाठी मी देखील अनेक वर्षांपासून काम करतोय. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत कृतीत सहभागी झालो. मी यापूर्वी कधीच माध्यमासमोर आलो नाही. मी जरांगे यांना पाटील म्हणणार नाही. कारण जरांगेकडे पाटील पदासाठी काही नाही. तो हेकेखोर आहे, कोणत्याही शब्दावर अडून राहायचा. आमचा समाज खूप भोळा आहे, असे अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार कुणी दिला? राज ठाकरेंनी मराठा समाजाला जागृत राहण्याचा इशारा दिला

पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेले १६ टक्के आरक्षण १० टक्क्यांवर कसे आले? Devendra Fadnavis म्हणाले…

“उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या…”, मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल