ब्रेकिंग! शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि जावईकडे अदानी कंपन्यांचे ४५ हजार शेअर्स!

नवी दिल्ली- हिंडेनबर्गच्या अहवालानंतर भारताचे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) मोठ्या अडचणीत सापडले होते. अदानी समूहाने सामाजिक फेरफार आणि अकाऊंटींग फ्रॉड केल्याचा आरोप अहवालात केला होता. परिणामी त्यांना व्यवसायात मोठे नुकसान झेलावे लागले होते. देशभरात कॉंग्रेस चांगलीच आक्रमक झाली होती. अदाणींच्या कथित शेल कंपन्यांत २० हजार कोटी रूपये कुणाचे आहेत? असा सवाल राहुल गांधींनी (Rahul Gandhi) करत संयुक्त संसदीय समिती (जेपीसी, JPC) स्थापना करून चौकशीची मागणी केली होती.

परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी जेपीसीच्या आवश्यकता नसल्याचे विधान करून राहुल गांधी यांना विरोध दर्शवला होता. तसेच काही दिवसांपूर्वी गौतम अदानींनी स्वत: शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली होती. यादरम्यान आता पवार कुटुंबाशी संबंधित मोठी अपडेट पुढे आली आहे. शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे व जावई सदानंद सुळे यांच्याकडे अदानींच्या सहा कंपन्यांचे ४५ हजार शेअर्स आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

दिव्य मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे. सुप्रिया सुळे (Supriya Suleयांच्याकडे अदानी कंपन्यांचे तब्बल २६ हजार १२० शेअर्स असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पवारांचे जावई सदानंद सुळे यांच्याकडे देखील अदाणी समूहाच्या कंपनींचे तब्बल १८ हजार ९७७ शेअर्स आहेत. म्हणजेच सुळे दाम्पत्याकडे अदाणी समूहाच्या कंपनीचे एकूण ४५ हजार शेअर्स असल्याचं समोर आलं आहे.