वांगीताईने ‘साडी नेसून या’ म्हटलं तर समस्त पुरोगामी मराठी पत्रकार डोक्यावरून पदर घेऊन त्रिवार मुजरा पण करतील!

पुणे – शिवप्रतिष्ठान संघटनेचे सर्वेसर्वा संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी टिकली लावली नसल्याने एका महिला पत्रकाराशी बोलण्यास नकार दिला होता. संभाजी भिडेंनी यावेळी केलेल्या विधानानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चॅनेलमधील मुलींनी साडी नेसण्याबद्दल विधान केलं असून, त्यावर टीका होत आहे.

‘चॅनलमधल्या मुली साडी का नाही नेसत? शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? मराठी भाषा बोलताना? मग मराठी संस्कृतीसारखे कपडे आपण का नाही घालत? आपण सगळ्या गोष्टींचं वेस्टर्नायझेशन करतोय’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याचा लेखिका शेफाली वैद्य यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्या आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, भिडे गुरूजींनी ‘कुंकू लावून ये तर बोलतो’ म्हटलं तर मराठी पत्रकारांना वांत्या होतात. वांगीताईने ‘साडी नेसून या’ म्हटलं तर समस्त पुरोगामी मराठी पत्रकार डोक्यावरून पदर घेऊन त्रिवार मुजरा पण करतील!असं वैद्य यांनी म्हटले आहे.

दरम्यान, संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आंदोलन करणारे आणि भिडे यांच्यावर टीकेची झोड उठवणारे आता नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.