भारत जोडो यात्रेसाठी भाजी विक्रेत्याकडून वसुली, काँग्रेस कार्यकर्त्यांनी 2000 रुपयांसाठी धमकावले 

कोल्लम – केरळमधील कोल्लम शहरातील काही काँग्रेस कार्यकर्त्यांचे कृत्य सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्रत्यक्षात या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांवर भाजीपाला दुकानदारांकडून खंडणी उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर भाजपने या प्रकरणावरुन काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.

कोल्लममधील वृत्तानुसार, असा दावा करण्यात आला आहे की, जेव्हा एका भाजी विक्रेत्याने काँग्रेसच्या भारत जोड यात्रेसाठी देणगी दिली नाही तेव्हा त्याला केवळ मारहाणच झाली नाही तर त्याच्या दुकानाची तोडफोड करण्यात आली तसेच त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली असा आरोप आहे.

भाजीचे दुकान चालवणाऱ्या एस फवाज यांनी कुन्नीकोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याच्या दुकानात पोहोचलेल्या काँग्रेसच्या पाच कार्यकर्त्यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अनिश खान यांचाही मारहाण, धमकावणे आणि शिवीगाळ करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुकानात काम करणाऱ्या मुलांना मारहाण करून भाजीपाला खाली फेकल्याचा आरोपही आहे. पिडीत व्यक्तीने सांगितले की, ‘त्यांनी 2000 रुपयांची मागणी केली होती, पण मी फक्त 500 देऊ शकलो. त्यामुळे त्यांनी आधी मला मारहाण केली आणि नंतर माझ्या दुकानाची तोडफोड करून गोंधळ घातला. गर्दी वाढत असल्याचे पाहून आरोपी जीवे मारण्याची धमकी देत तेथून निघून गेले. zee न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे.