पुतना मावशीचा आव आणण्यापेक्षा आदिनाथ कारखान्याला मदत करावी -चिवटे 

करमाळा/ प्रतिनिधी –आदिनाथ कारखान्याला मदत करण्याची खरीच इच्छा असेल तर बारामती ॲग्रो च्या माध्यमातून पाच कोटी रुपये आदिनाथ मध्ये ठेव पावती करून आदिनाथ वाचवण्याचा प्रयत्न सुभाष गुळवे यांनी करावा केवळ पुतना मावशीचा कळवळा दाखवून करमाळा तालुक्याची जनतेची दिशाभूल करू नये असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे.

आदिनाथ ताब्यात द्या आम्ही चालू करू अशी सुभाष गुळवे वल्गना केल्यानंतर बचाव समितीचे सदस्य महेश चिवटे यांनी याला उत्तर दिले आहे. तीन वर्षांपूर्वी बारामती ॲग्रोवन आदिनाथ साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेतला मात्र जाणीवपूर्वक तीन वर्ष कारखाना सुरू केला नाही. जेणेकरून आदिनाथ कारखान्यावर कर्ज वाढेल. आदिनाथ जास्त अडचणीत येईल या दृष्ट भावनेतून बारामती ऍग्रो कंपनीने आदिनाथ कारखाना बंद ठेवला.

2021-22 च्या हंगामात बारामती ॲग्रो ची झालेली विस्तारीकरण यशस्वी करण्यासाठी आदिनाथ बंद ठेवून करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त बारामती ऍग्रो गाळण्यास नेला. यामुळे गतवर्षी शेतकऱ्यांना ऊस पेटवून द्यावा लागला. यामुळे सर्व सभासदांनी एकत्र येऊन बचाव समिती निर्माण करून बारामती ॲग्रो चा करार रद्द केला.

आता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने आदिनाथ कारखाना सुरू होत आहे. अनेक अडचणीवर मात करत पैशाची उभारणी केली आहे. आता केवळ काही रक्कम अपुरी आहे त्यासाठी ही सर्व प्रामाणिक सभासद काम करत आहेत असे असताना सुद्धा पुन्हा आदिनाथ आपल्याला हडप करता येईल या भूमिकेतून सभासदा दिशाभूल करण्याचे काम गुळवे करत आहेत.

बारामती ॲग्रो ची रोहित पवार व सुभाष गुळवे यांचे खरेच आदिनाथ कारखान्यावर प्रेम असेल करमाळा तालुक्यातील जनतेवर प्रेम असेल तर त्यांनी पुतना मावशीचा आव न आणता पाच कोटी रुपयांची ठेव पावती आदिनाथ कारखान्यात करावी व आदिनाथ प्रामाणिकपणे सुरू करण्यासाठी मदत करावी.

करमाळा तालुक्यातील जनतेने पवार कुटुंबाला भरभरून साथ दिली आहे देशाचे नेते शरद पवार यांना सुद्धा माढा लोकसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्य करमाळा तालुक्यातील जनतेने दिली आहे. राष्ट्रवादीचा तीन वेळा आमदार निवडून दिला आहे याची जाणीव पवारांनी ठेवून आदिनाथ कारखान्याच्या खात्यात पाच कोटी रुपयांची ठेव करावी व कारखाना सुरू करण्यासाठी वाहनाची मदत करावी.

शरद पवार हे सहकाराचे पुरस्कर्ते आहेत त्यामुळे सहकार वाचवण्यासाठी शरद पवारांचा आदर्श घेऊन रोहित पवारांनी करमाळा तालुक्यातील आदिनाथ कारखान्याला मदत करावी अशी मागणी ही सभासदातून होत आहे.आजिनाथ चे कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम करून इथपर्यंत आदिनाथ चा गाडा आणला आहे. मात्र आता या आदिनाथ वर राजकारणाच डावपेच आखणाऱ्या आजी-माजी आमदारांनी प्रत्येकी दोन दोन कोटी रुपयांची ठेव केली तर आदिनाथ चा मार्ग सुकर होईल.आदिनाथ च्या गप्पा मारायच्या व मदत करताना खिशातली दमडी काढायची नाही अशा आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आदिनाथ बाहेर काढण्यासाठी मदत केली पाहिजे.