ओ ताई… उगा विक्टिम कार्ड नका खेळू! शेफाली वैद्य यांची फेसबुक पोस्टची चर्चा

पुणे – ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी महिला पत्रकारने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ”तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असे विधान केले आहे.

संभाजी भिडे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले असताना साम टिव्हीच्या महिला पत्रकाराने त्यांना याबाबत प्रश्न विचारला. यावेळी बोलताना त्यांनी ”प्रत्येक स्त्री भारतमातेस्वरूप असते. भारतमाता ही विधवा नाही. त्यामुळे तू आधी कुंकू लाव, मगच मी तुझ्याशी बोलतो”, असे विधान केले. या वक्तव्यावरून सध्या चांगलेच वातावरण तापले असून प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांनी एका फेसबुक पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पाहूयात नेमकं काय म्हटलं आहे शेफाली वैद्य यांनी…

त्या म्हणाल्या, ओ ताई, तुम्हाला जसा बिंदी लावायचा किंवा न लावायचा अधिकार आहे. तसा भिडे गुरुजींना पण अधिकार आहे हे ठरवायचा की त्यांनी कुणाशी बोलावं, त्यालाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात आणि ते फक्त तुम्हालाच आहे असं नाही, आणि तुम्ही त्यांच्याशी बोलायला गेला होतात, ते नव्हते मागे लागले तुमच्या, ‘माझी बाईट घ्या, माझी बाईट घ्या’ म्हणून, हौस तुम्हाला होती, गरजही तुम्हाला होती.

वर भारतमाता म्हटलंय तुम्हाला, शिव्या नाही दिल्या, लोकशाहीत तुम्हाला जसा बिंदी लावायची किंवा नाही हे ठरवायचा अधिकार आहे. तसा तो भिडे गुरुजींना पण आहे, तुमच्याशी बोलायचं की नाही ठरवायचा, उगा विक्टिम कार्ड नका खेळू! असं वैद्य यांनी म्हटले आहे.