आतापर्यंत नोबेल ६० महिलांना तो मिळाला व त्यापैकी एकीनेही टिकली वापरली नव्हती – झगडे

पुणे – ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी महिला पत्रकारने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ”तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असे विधान केले आहे.

संभाजी भिडे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले असताना साम टिव्हीच्या महिला पत्रकाराने त्यांना याबाबत प्रश्न विचारला. यावेळी बोलताना त्यांनी ”प्रत्येक स्त्री भारतमातेस्वरूप असते. भारतमाता ही विधवा नाही. त्यामुळे तू आधी कुंकू लाव, मगच मी तुझ्याशी बोलतो”, असे विधान केले. या वक्तव्यावरून सध्या चांगलेच वातावरण तापले असून माजी आयुक्त महेश झगडे (Mahesh Zagade) यांनी देखील यावर भाष्य केले आहे.

ते म्हणतात, दरडोई GDPनुसार भारत १२२व्या क्रमांकावर आहे. त्यावरील १२१ देशातील स्त्रिया टिकली लावत नाहीत.जगातील नोबेल हा सर्वोच्च सन्मान समजला जातो. आतापर्यंत ६० महिलांना तो मिळाला व त्यापैकी एकीनेही टिकली वापरली नव्हती. असं त्यांनी म्हटलं आहे.