शिंदे गटातील आमदार ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण

Mumbai – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला खिंडार पडले आहे. गेल्या दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षामुळे राज्यात सत्तांतर झाले आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील नाराज आमदारांनी भाजपला (BJP) पाठिंबा देत सत्ता स्थापन केली असून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे उपमुख्यमंत्री झाले आहे. अजुन मंत्री मंडळाचा विस्तार झालेला नाही. मात्र, कुणाला कुठली खाती मिळणार याकडे लक्ष लागले असतांना मंगळवारी शिंचे गटाच्या आमदार सदा सरवणकर यांनी थेट शिवतीर्थावर जात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (mla sada sarvankar) यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.  या भेटीमुळे दादर परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आमदार सदा सरवणकर अचानक शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात खळबळ उडाली होती. सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्व शिंदे गटातील आमदार हे आपआपल्या मतदारसंघात पोहोचले आहे. आज सकाळी सदा सरवणकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ (Shivteerth) निवास्थानी जाऊन भेट घेतली.

याबाबत बोलताना सरवणकरांनी राज ठाकरेंच्या भेटीचे कारण स्पष्ट केलं आहे. सेनेला टक्कर देण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत अशी चर्चा रंगली आहे. मात्र, यामध्ये कोणतेही तथ्य नाही. एक हिंदूत्वाची लढाई आहे. अखंड हिंदू एकत्र करण, आणि त्यांच्यासाठी झगडनं हेच त्यामागचं उद्देश आहे.आगामी निवडणुकाबाबत विचारले असता, हा निर्णय मुख्यमंत्री घेतील. असे सरवणकर म्हणाले.