Porsche car Accident | “निबंधात कमी मार्क्स मिळाले म्हणून तुरुंगात तुरुंगात घालायचा कायदा तरी आणा”; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप

पुण्यात कल्याणीनगर इथं शनिवारी रात्री झालेल्या वाहन अपघात प्रकरण (Porsche car Accident ) सध्या चांगलेच चर्चेत आहे. कल्याणी नगर जंक्शन भागात रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने मोटरसायकलला धडक दिली होती. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. या घटनेवर आता मराठी अभिनेते हृषीकेश जोशी (Hrishikesh Joshi) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.

त्याचे झाले असे की, अपघात प्रकरणी (Porsche car Accident) अल्पवयीन आरोपीला अटकेनंतर 24 तासांच्या आतच जामीन देण्यात आला आहे. तसेच त्याला सुनावलेली शिक्षा अतिशय हास्यास्पद होती. दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या मुलाला कोर्टाने आरोपीला 15 दिवस येरवडा विभागातील पोलिसांसोबत ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी मदत करावी लागेल. तसेच वाहतूक जागृतीचे फलक रंगवावे लागतील. आरोपीला मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घ्यावे लागतील. भविष्यात आरोपीने कोणताही अपघात पाहिला तर त्याला सर्वप्रथम अपघात ग्रस्तांची मतद करावी लागेल. रस्ते अपघाताचे परिणाम आणि त्यावरील उपाय या विष्यावर आरोपीला कमीत कमी 300 शब्दांचा निबंध लिहावा लागेल, अशी शिक्षा ठोठावली.

यावर मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखकी हृषीकेश जोशी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहीत त्यांची नाराजी व्यक्त केली. “मग आता निबंधात कमी मार्क्स मिळाले म्हणून तुरुंगात घालायचा कायदा तरी आणा… (पुणेप घात)” अशी मार्मिक पोस्ट लिहीत हृषीकेश यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली.

अनेकांनी हृषीकेश यांच्या पोस्टवर कमेंट करत त्यांच्या नाराजीचं समर्थन केलं आणि आरोपीला कठीण शिक्षा व्हायला हवी अशी मागणी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप