योगींना आव्हान द्यायला गेलेल्या शिवसेनेची उडाली दाणादाण; सेनेच्या पदरी भोपळा  

लखनौ : उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे. याबरोबरच काही पोटनिवडणुकांचीही मतमोजणी आज होणार असून मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिद्धू, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.

दरम्यान,  भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात भाजपला 236 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, सपाला 97 जागांवर आघाडी मिळालीय. अपना दल 9 जागांवर बीएसपी 5 जागांवर, काँग्रेस 4 जागांवर, जनता दल यू 1, जनसत्ता दल लोकतांत्रिक 2, निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल 5 जागा, राष्ट्रीय लोक दल 6 आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 3 जागेवर आघाडीवर आहे.

दरम्यान,  उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) भाजपला मात देण्यासाठी शिवसेना (Shivsena) ही निवडणुकीच्या रिंगणात उतरली. मात्र अद्याप उत्तर प्रदेशमध्ये आपलं खातं खोलता आलं नाही.   उत्तर प्रदेशात शिवसेनेनं स्वतंत्रपणे उमेदवारी उभे केले होते. सुरुवातीच्या कलांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना 0.02 टक्के मते मिळाली. तर नोटा पर्यायाला 0.71 टक्के मतं मिळाली.