हज यात्रेला जाणा-या भाविकांसाठी आरोग्य चाचणी प्रक्रिया सुलभ करावी – रिदा रशिद

Mumbai –  हजला यात्रेला जाणा-या भाविकांच्या आरोग्य चाचणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष व जे.जे.हॉस्पिटल कमिटी सदस्य रिदा रशिद यांनी जे.जे. हॉस्पिटलच्या डीन पल्लवी सापळे व आरोग्य अधिकारी अश्विनी राठोड यांची भेट घेतली.

हज यात्रेला जाणा-या भाविकांच्या विविध तपासण्या ह्या रमजान महिन्यात होत असल्याने भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या तपासण्या रोजा (उपवास) असल्याने भाविकांच्या सोईनुसार व लवकरात तपासण्यांचे रिपोर्ट मिळाल्यास त्यांच्या अडचणी कमी होतील. त्यामुळे आरोग्य चाचणीचे रिपोर्ट कमीत कमी वेळेत भाविकांना मिळावे अशी मागणी ही रिदा रशिद यांनी केली. यावेळी जे.जे.हॉस्पिटलचे डीन सापळे व आरोग्य अधिकारी राठोड यांनी भाविकांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष एजाज देशमुख, मुस्लीम राष्ट्रीय संघाचे राष्ट्रीय संयोजक इरफान पीरझादे, अफजल दाऊदानी-हज कमिटी मेंबर महाराष्ट्र, भाजपा कार्यकर्ते सुधीर चिमुळकर उपस्थित होते.