‘ते’ ट्विट मोबाईलच्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे झालं, संजय शिरसाटांचा डायरेक्ट यू-टर्न!

संभाजीनगर – शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी काल एक ट्विट केलं त्याची जोरदार चर्चा झाली. शिरसाट पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसोबत जाणार असल्याची चर्चा झाली. त्यावर आता संजय शिरसाट यांनीच आपली प्रतिक्रिया देत पडदा टाकलाय. “मी एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) होतो, आहे आणि त्यांच्याच सोबत राहणार आहे. का झालेलं ‘ते’ ट्विट मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेममुळे झालं”, असं म्हणत संजय शिरसाट यांनी यू-टर्न घेतलाय. शिवाय उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आमचे कुटुंब प्रमुख होते आता नाहीत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ठाकरे कुटुंबाबद्दल अपशब्द निघणार नाही, हीच आमची भूमिक आहे. मात्र, टीका केली तर उत्तर मिळणार असल्याचेही शिरसाट यावेळी म्हणाले. मी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली आहे. मला औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद द्यावे अशी मागणी केल्याचंही शिरसाट यांनी सांगितले.

मी कधीही कुठेही दबावतंत्राचा वापर केला नाही. मला काय द्यायचं याबाबत अंतिम निर्णय हा एकनाथ शिंदे घेतील असेही शिरसाट यावेळी म्हणाले. पुढच्या मंत्रीमंडळ विस्तार मला संधी मिळणार असल्याचा शब्द दिला असल्याचेही ते म्हणाले.