महिनाभरापूर्वी कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे, बीडच्या उद्योजकाने थेट भाजपात केला प्रवेश

Beed Businessman Joins BJP: ‘द कुटे ग्रुप’चे प्रमुख तथा बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक सुरेश कुटे (Businessman Suresh Kute) व त्यांच्या पत्नी अर्चना यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या कोराडी (नागपूर) येथील  जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. यावेळी बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले व पक्षातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

खाद्यतेल, दुग्ध जन्य पदार्थ, हेअर ऑईल, वाहनांचे सुटे पार्ट, पेंड उद्योगातील प्रमुख नाव म्हणून बीडचा तिरुमला ग्रुप ओळखला जातो.  उद्योजक सुरेश कुटे हे बीड जिल्ह्यातील मोठं प्रस्थ आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे बीड जिल्ह्यात भाजपला आणखी बळ मिळणार आहे.

यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार गजाननराव घुगे, यशवंत कुलकर्णी, राजेश शुक्ला, प्रिंस त्यागी, शिवाजीराव परसकर, नवनाथ प्रभाळे, शेख शेरू पटेल, बबनराव लवटे, दगडू कानडे, शिवाजी घरत, गणेश वाघमारे, बबन वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान,ABP माझाच्या वृत्त्नुसार, बीड येथील तिरुमला उद्योग समूहाच्या कार्यालयावर आयकर विभागाने 10 ऑक्टोबर 2023 रोजी धाडी (Income Tax raid On Tirumala Group) टाकल्या होत्या. तिरूमला उद्योग समूहाच्या विविध पाच शहरातील कार्यालयावर या धाडी टाकण्यात आल्या होत्या. या घडामोडी घडल्या असताना आता कुटे यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

प्रदूषणात घराबाहेर पडत असाल तर ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; दुष्परिणामांपासून करा स्वत:चा बचाव

पूर्ण कुटुंबासह परिणीती चोप्रा पोहोचली हनीमूनला, मालदीवमध्ये सासूसोबत पोज देताना दिसली

नास्तिक असलो तरीही रामसीतेच्या देशात जन्मल्याचा मला अभिमान आहे- जावेद अख्तर