‘कोल्हापुरच्या मातीने इतिहास घडवुन जयश्रीताईंना आशिर्वाद देऊन भाजपा मुक्त जिल्हा केल्याबद्दल अभिनंदन’

मुंबई – संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव (Jayashree jadhav) yयांनी भाजपचे सत्यजित कदम (Satyjeet kadam)  यांचा 18,901 मतांनी पराभव केला  आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे.

पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये (Kolhapur) आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं. एकूण 26 फेऱ्यांमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. जयश्री जाधव पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. मधल्या काही फेऱ्या वगळता त्यांनी आपली आघाडी कायम राखली. अखेर त्यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला. जयश्री जाधव यांना ९६ हजार २२६ मतं मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांना ७७ हजार ४२६ मतं मिळाली आहेत.

दरम्यान, या निकालानंतर आता राजकीय प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला यानिमित्ताने डिवचले आहे. ते म्हणेल, कोल्हापुरच्या मातीने इतिहास घडवुन मविआच्या जयश्रीताईं जाधव यांना आशिर्वाद देऊन भाजपा मुक्त जिल्हा केल्याबद्दल जोरदार अभिनंदन. हनुमान जयंती ला महावीर हनुमानाच्या आशीर्वादाने मिळालेल्या या आशीर्वादाचा हनुमान चालीसेत उल्लेखआहे " भुत पिशाच निकट नहीं आवे l महावीर जब नाम सुनावे ll