पराभवानंतरही कॅप्टन हार्दिकने धोनीचे कौतुक करत जिंकली मने; म्हणाला, ‘हीच माहीची खासियत’

IPL 2023 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्ज संघ गुजरात टायटन्ससमोर होता. CSK संघाने हा सामना 15 धावांनी जिंकला आहे. यासह CSK हा IPL 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना CSK ने 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 10 गडी गमावून 157 धावाच करू शकला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना CSK संघाने 7 गडी गमावून 172 धावा केल्या. सीएसकेकडून डावाची सुरुवात करणाऱ्या रुतुराज गायकवाडने 44 चेंडूत 60 धावा केल्या. याशिवाय डेवॉन कॉनवेच्या बॅटमधून 40 धावांची खेळीही झाली. त्याचवेळी अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायडू यांनी 17-17 धावा केल्या. याशिवाय रवींद्र जडेजाने 22 धावांची खेळी खेळली. गुजरातकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्माने 2-2 बळी घेतले.

दरम्यान गुजरातच्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने मन जिंकणारी प्रतिक्रिया दिली आहे. हार्दिक म्हणाला की, “मला वाटते की आम्ही गोलंदाजीत चांगली कामगिरी केली, पण काही मूलभूत चुका केल्या. यामुळे आम्हाला सामना महागात पडला. आमच्याकडे ज्या प्रकारचे गोलंदाज होते, मला वाटले की आम्ही 15 अतिरिक्त धावा दिल्या. आम्ही अनेक गोष्टी बरोबर केल्या. आम्ही काही चांगले बॉल टाकले आणि मध्ये एक स्लो बॉल टाकला. आम्ही आमच्या योजना राबवत होतो आणि मग मध्येच आम्ही काही धावा दिल्या. मला वाटत नाही की आपण त्यावर जास्त लक्ष घालण्याची गरज आहे. आम्हाला दोन दिवसांनी (क्वालिफायर-2) खेळायचे आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी आम्हाला आणखी एक सामना खेळावा लागेल. या हंगामात आम्ही खरोखरच चांगली कामगिरी केली आहे, त्यावर फक्त लक्ष केंद्रित करा.”

हार्दिकने आपल्या आयडॉल धोनीचे कौतुक केले
माहीच्या (MS Dhoni) कॅप्टन्सीचे कौतुक करताना हार्दिक म्हणाला, “ही धोनीची खासियत आहे. त्याच्या मनाने आणि ज्या पद्धतीने तो गोलंदाजांचा वापर करतो, तो तुम्हाला त्याच्या एकूण धावसंख्येमध्ये आणखी 10 धावांची भर घालत असल्याची खात्री करतो. आम्ही विकेट्स गमावत राहिलो आणि धोनीने योग्य गोलंदाजांचा वापर केला याची खात्री करत राहिलो. मी त्याच्यासाठी आनंदी आहे. जर आम्ही पुढचा सामना जिंकला तर रविवारी पुन्हा धोनीविरुद्ध खेळणे खरोखरच आनंददायी ठरेल. खंत आयुष्यात चांगली नाही. मैदानावर दव येईल अशी आशा होती, तसं झालं नाही. आम्ही 15 धावा अतिरिक्त दिल्या आणि आम्ही दोन्ही विभागांमध्ये योग्य कामगिरी केली नाही. आम्ही दोन दिवसांनी पुन्हा सामना खेळू आणि चांगली कामगिरी करण्याची आशा आहे.”