मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर श्रीकांत शिंदे बसतात? ‘तो’ फोटो ट्वीट करत राष्ट्रवादीचा गंभीर आरोप!

हा कोणता राजधर्म आहे?असा कसा हा धर्मवीर?

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची सत्ता आल्यापासून शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहेत. यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची भर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा दावा वरपे यांच्याकडून करण्यात आला आहे.

खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात.लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय.हा कोणता राजधर्म आहे?असा कसा हा धर्मवीर? असा खोचक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.