Anand Paranjape | भुजबळांनी माघार घेतली असली तरीही राष्ट्रवादीने नाशिक लोकसभेवरचा दावा सोडलेला नाही

Anand Paranjape | राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ट नेते छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणूकीत उमेदवारी माघारी घेतलेली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक लोकसभे वरील दावा सोडलेला नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे (Anand Paranjape) यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीत ठिणगी पडण्याच्या शक्यता आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नाशिक लोकसभा मतदारसंघात 2004 ते 2009 मधे राष्ट्रवादीचे देविदास पिंगळे तर 2009 ते 2014 मधे समीर भुजबळ खासदार होते. सध्या नाशिक लोकसभेत राष्ट्रवादीचे तीन आमदार असून या मतदारसंघात पक्षाची ताकद आहे. त्यामुळे आजही राष्ट्रवादी काँग्रेसचा नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा कायम आहे. असे आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान सातार लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे असला तरी याबदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यसभेची एक अतिरिक्त जागा देण्याचा समझोता झाला आहे, अशी माहितीही आनंद परांजपे यांनी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

NCP Maniesto |आरोग्य, शिक्षण,स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार या ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर राष्ट्रवादी काम करणार

एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या, हा आरोप धादांत खोटा; राणा जगजितसिंहांचे ओमराजेंना प्रत्युत्तर

१० वर्षांपूर्वी मनपाने वाघोलीतील पाणी प्रश्नासाठी निधी दिला होता, ते काम अजूनही अपूर्ण, शिवाजीदादांची कोल्हेंवर टीका