IPL 2024 | दिल्ली कॅपिटल्ससाठी गुड न्यूज! ऋषभ पंत आयपीएल 2024 साठी मैदानावर उतरण्यास सज्ज

IPL 2024 | आयपीएल 2024 पूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि त्याच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याला तंदुरुस्त घोषित केले आहे. मंडळाने मंगळवारी ही माहिती दिली. याआधी सोमवारी बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) यांनी पंत तंदुरुस्त असल्याचे सांगितले होते.

दुखापतीमुळे टीम इंडियापासून दूर असलेला पंत काही काळ बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये होता, जिथे 26 वर्षीय खेळाडू पुनर्वसनासह सराव करताना दिसला होता. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये पुनरागमन करण्यास तयार आहे.

पंत आयपीएल 2024 साठी सज्ज आहे
बीसीसीआयने पंतला तंदुरुस्त घोषित करताना म्हटले आहे की, “30 डिसेंबर 2022 रोजी उत्तराखंडच्या रुरकीजवळ झालेल्या भीषण रस्ता अपघातानंतर 14 महिन्यांच्या पुनर्वसनानंतर, ऋषभ पंतला आता आगामी आयपीएलसाठी यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

CAA Act | भारताचा CAA कायदा काय आहे? ज्याबाबत मोदी सरकारने अधिसूचना जारी केली, वाचा सर्वकाही

Pankaja Munde | पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको

Ajit Pawar | पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य