Pune Congress | पुण्यात काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर; चव्हाण,थोरात यांच्या पुढे बॅनरबाजी 

पुणे लोकसभा मतदार संघामध्ये कॉंग्रेसमधील (Pune Congress) वाद हा मोठ्या चर्चेचा मुद्दा बनला आहे. एकीकडे पुण्यातील काँग्रेस मधले अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी वरिष्ठ नेते मंडळी प्रयत्न करत आहेत मात्र काही केल्याने हे वाद मिटत नसल्याचे चित्र आहे. यातच आता पुण्यात काँग्रेस मधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. भाजपच्या नेत्यांची नागपूरमध्ये जाऊन भेट घेऊन येणा-यांचा जाहीर निषेध असे फलक पुण्यात लावण्यात आले…. गद्दार भागाओ, काँग्रेस बचाओचे बॅनर काँग्रेस (Pune Congress) भवनमध्ये झळकले. नाव न घेता आबा बागुल यांना उद्देशून हे फलक लावण्यात आले. पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना दाखवण्यासाठी दोन काँग्रेस कार्यकर्ते फलक घेऊन उभे होते.

नेमकं घडलं काय ?
काल रविवारी रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेल्या पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यापुढेच काँग्रेस भवन येथे गटबाजीचे राजकारण रंगले.काँग्रे स नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी  पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस आणि इंडिया आघाडीला देशात चांगलं यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसचे दोन पदाधिकारी काँग्रेसभवनमध्ये बॅनर्स घेऊन आले. त्यांनी आबा बागुल यांच्या हकालपट्टी मागणी केली. दरम्यान, यासारख्या अंतर्गत घडामोडींमुळे काँग्रेसच्या प्रचाराला वेग येताना दिसत नाहीये अंतर्गत गटबाजीचा फटका काँग्रेस उमेदवाराला बसणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन