…. म्हणून आप्पांसमोर धनंजय महाडिक यांना आपले आनंदाश्रू रोखता आले नाहीत

कोल्हापूर – विजयश्री खेचून आणणाऱ्या खा. धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे शिरोलीत आगमन होताच महादेवराव महाडिक यांच्या निवासस्थानी वाट बघणाऱ्या महाडिक कुटुंबीय आणि समर्थकांनी एकच जल्लोष केला. गाडीतून उतरताच समर्थकांच्या गराड्यातून वाट काढत धनंजय महाडिक यांनी आप्पांची गळाभेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी कोल्हापूरच्या राजकारणातील भीष्माचार्य (Bhishmacharya in politics) आप्पांसमोर खा. धनंजय महाडिक यांना आपले आनंदाश्रू (Tears of joy) रोखता आले नाहीत. या भावनिकतेने भारावलेल्या प्रसंगात प्रचंड संख्येने उपस्थित महाडिक समर्थकदेखील भारावून गेले.

अनेक दिवस हुलकावणी देणारी विजयश्री खेचून आणल्यानंतरची संघर्षाभिमानाची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. यानंतर शौमिका महाडिक (Shaumika Mahadik) यांच्यासह महाडिक परिवारातील महिलांनी धनंजय महाडिक यांचे औक्षण केले. यावेळी विजयासाठी शर्थीचा प्रयत्न करणारे अमल महाडिक (Amal Mahadik), स्वरूप महाडिक (Swaroop Mahadik) आदी महाडिक बंधू उपस्थित होते.