‘लिहून ठेवा 2024 ला 42 ते 43 खासदार आणि विधानसभेला 160 ते 170 जागा घेणार’

कोल्हापूर – 2024 ला लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही आम्ही एकट्याने लढणार आहोत. मग त्यांनी तिन्ही पक्षाने सोबत यावे की, एकट्याने यावे हा त्यांचं प्रश्न आहे. पण लिहून ठेवा 2024 ला 42 ते 43 खासदार आणि विधानसभेला 160 ते 170 जागा घेणार, असं भाकितच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil)  यांनी वर्तवलं आहे.

राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांची कोल्हापूरमध्ये जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. तब्बल 3 तास ही मिरवणूक चालली होती. अंबादेवी मंदिरात या मिरवणुकीचा समारोप झाला. महाडिकांनी सहकुटुंब अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती होती. यानंतर माध्यमांशी बोलत असताना पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला चॅलेंज दिलं.