ते आमदार आपले नव्हतेच, पक्षातील घाण गेली; बंडखोर आमदारांवर आदित्य ठाकरे बरसले 

मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ४० शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray)  हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, बंडखोर शिंदे गटाच्या व्यूव्हरचनेला निष्पभ्र करण्यासाठी तसेच शिवसेनेची पडझड रोखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि तमाम शिवसैनिक मैदानात उतरले आहेत.या सर्व घडामोडींमुळे शिवसेनेच्या दोन गटात मोठा संघर्ष निर्माण झाला आहे.

दरम्यान, ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे, ते आमदार आपले नव्हतेच, पक्षातील घाण गेली असं मत त्यांनी व्यक्त करत गेली ती घाण गेली असा घणाघातही त्यांनी बंडखोर आमदारांवर त्यांनी केले. ज्या बंडखोर आमदारांनी कारणं सांगत बंडखोरी केली आहे, त्यांची किती तरी कामं आपण केली आहेत, आणि जो जनतेचा निधी आहे, तो जनतेला तात्काळ दिला आहे असं मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

आपले मुख्यमंत्री वर्षामध्ये राहायला असताना त्यांनी नेहमीच कामात गुंतवून घेतले होते. मात्र ज्यावेळी बंडखोरी झाल्यानंतर वर्षा सोडण्याचा प्रसंग आला त्यावेळी कोणताही मोह न बाळगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ सोडला.असं देखील त्यांनी आवर्जून सांगितले.