काही आमदारांनी कळवलं आहे की, इथे आमचा खूनही होऊ शकतो – राऊत

मुंबई – विधान परिषदेच्या निकालाने (Result of the Legislative Council) महाविकास आघाडीला (MVA) झटका बसला असून, शिवसेनेतील (Shivsena) महत्त्वाचे नेते आणि सध्या कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्त आहे. शिंदे हे सध्या गुजरातमध्ये (Eknath Shinde in Gujarat) गेले आहेत. सध्या ते सुरतमधील ली मेरिडिअन या हॉटेलमध्ये आहेत अशी माहिती समोर येत आहे.

राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार अडचणीत (Thackeray government in trouble) आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे भाजपबरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. आम्ही शिवसैनिक आहोत आणि अजूनही शिवसेनेसोबतच आहोत, अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना गटनेतेपदावरुन काढून टाकण्यात आलं आहे. अजय चौधरी यांना शिवसेनेचे नवे गटनेते बनवण्यात आल्याचं कळतं आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, काही आमदारांनी कळवलं आहे की, आमच्या जीवाला धोका आहे. इथे आमचा खूनही होऊ शकतो. असं वातावरण का निर्माण केलं जातंय, मला कळत नाही. पण या सगळ्यातून शिवसेना बाहेर पडेल. शिवसेनेचं संघटन पुन्हा एकदा यातून उभं राहिलं.

एकनाथ शिंदेंची पक्षाच्या गटनेते पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. तसेच, एकनाथ शिंदेंनी दिलेला कोणताही प्रस्ताव शिवसेना स्विकारणार नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह झालेल्या शिवसेना नेते आणि आमदार, खासदारांच्या बैठकीत एकमतानं ठरवण्यात आलं. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा बंड मोडून काढण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरु असल्याचं बोललं जात आहे.