Sunetra Pawar | ‘रामकृष्ण हरी, ताईपेक्षा वाहिनीच भारी’, सुनेत्रा पवारांसाठी शिवसेनेची महिला आघाडी मैदानात

Sunetra Pawar: बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी आता शिवसेनेची महिला आघाडी मैदानात उतरली आहे. यावेळी बोला ‘रामकृष्ण हरी, ताई पेक्षा आमची वाहिनीच भारी’ अशा घोषणा शिवसेनेच्या पुणे जिल्हा महिला पदाधीकाऱ्यांनी दिल्या.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारास आज इंदापूरमधून सुरूवात करण्यात आली. त्यापूर्वी शिवसेनेच्या पुणे जिल्हा पदाधीकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष सीमा कल्याणकर, गीतांजली ढोणे, मंगेश चिवटे, राम भाई राऊत तसेच शिवसेना वैद्यकीय कक्षाचे व्यवस्थापक वा पदाधिकारी उपस्थित होते.

त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष सीमा कल्याणकर म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही आज आठवडे बाजारापासून सुरूवात केली आहे. आठवडे बाजारामध्ये पत्रक वाटून महिलांनी सुनेत्रा पवार यांना अधिक मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले.

महत्वाच्या बातम्या-

NCP Maniesto |आरोग्य, शिक्षण,स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार या ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर राष्ट्रवादी काम करणार

एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या, हा आरोप धादांत खोटा; राणा जगजितसिंहांचे ओमराजेंना प्रत्युत्तर

१० वर्षांपूर्वी मनपाने वाघोलीतील पाणी प्रश्नासाठी निधी दिला होता, ते काम अजूनही अपूर्ण, शिवाजीदादांची कोल्हेंवर टीका