Narendra Modi | जनतेच्या संपत्ती, मालमत्तांवर कॉंग्रेसचा डोळा! पंतप्रधान मोदी यांचा जनतेला इशारा

Narendra Modi | गरिबी, घराणेशाही आणि भ्रष्टाचारापासून देशाला पूर्णपणे मुक्त करण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार आवश्यक आहे, म्हणूनच भाजपला भक्कम बहुमत देऊन विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यात सहभागी व्हा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे आयोजित केलेल्या विशाल जाहीर सभेत बोलताना केले. काँग्रेसचे सरकार बनले तर लोकांची मालमत्ता, पैसा, घरे, या सर्वांची चौकशी करून सार्वजनिक मालमत्ता ताब्यात घेण्याचे माओवादी धोरण राबविले जाईल, त्यामुळे सावध रहा, असा इशाराही पंतप्रधानांनी दिला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री असीम अरुण, संदीप सिंह, अलिगढलोकसभा उमेदवार सतीश गौतम आणि हाथरस लोकसभा उमेदवार अनुप वाल्मिकी यांच्यासह इतर नेते व्यासपीठावर उपस्थित होते. भाजप सरकारने गेल्या १० वर्षांत केलेली कल्याणकारी कामे आणि कामगिरी अधोरेखित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस-सपासह संपूर्ण इंडी आघाडीवर जोरदार निशाणा साधला.

भाजपला दिलेले प्रत्येक मत थेट मोदींना (Narendra Modi) जाते आणि जनतेनेही भाजपला पूर्ण आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेचे प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीचा हा महोत्सव साजरा करा, असेही पंतप्रधान म्हणाले. अलीगढच्या याच मैदानात मागच्या वेळी मी जनतेला सपा आणि काँग्रेसच्या घराणेशाही,भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या कारखान्याला कुलूप लावण्याची विनंती केली होती आणि जनतेने त्याला इतके मजबूत कुलूप लावले की,आजपर्यंत दोन्ही राजपुत्रांना त्याची चावीच मिळत नाही, अशा शब्दांत त्यांनी अलीगढच्या मतदारांची प्रशंसा केली.

काँग्रेस सरकारच्या काळात देशाच्या सीमेवर रोज हल्ले व्हायचे आणि देशाचे शूर सुपुत्र शहीद व्हायचे, त्यांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळले जायचे, पण आता असे दुर्दैवी प्रकार बंद झाले आहेत. पूर्वी रोज बॉम्बस्फोट व्हायचे, अयोध्या आणि काशी विश्वनाथमध्येही बॉम्बस्फोट झाले, पण आज शांततेत आणि सुरक्षिततेने विकास कामे होत आहेत. आधी कलम ३७० च्या नावावर जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी अभिमानाने राहत होते आणि आमच्या सैन्यावर दगडफेक होत होती, पण आता त्या सर्वाना पायबंद लागला आहे. अलिगढमध्ये देखील कर्फ्यूच्या बातम्या रोज ऐकायला मिळत होत्या, आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये अलिगढमधील जनता सुरक्षित आहे. दंगली, खून, खंडणी, टोळीयुद्ध, हीच सपा सरकारची ओळख होती आणि त्याभोवतीच त्यांचे राजकारणही फिरत होते. एक काळ असा होता की, आमच्या बहिणी आणि मुली घराबाहेर पडू शकत नव्हत्या, पण योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये गुन्हेगारांना कोणत्याही नागरिकाची शांतता भंग करण्याची हिंमत नाही. काँग्रेस आणि सपासारख्या भ्रष्ट पक्षांनी जनतेच्या प्रश्नांची कधीच पर्वा केली नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

NCP Maniesto |आरोग्य, शिक्षण,स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार या ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर राष्ट्रवादी काम करणार

एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या, हा आरोप धादांत खोटा; राणा जगजितसिंहांचे ओमराजेंना प्रत्युत्तर

१० वर्षांपूर्वी मनपाने वाघोलीतील पाणी प्रश्नासाठी निधी दिला होता, ते काम अजूनही अपूर्ण, शिवाजीदादांची कोल्हेंवर टीका