रोहितदादा पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेमुळे राज्य सरकार अस्वस्थ; विद्या चव्हाण यांचा दावा 

Vidya Chavhan –  आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा केली. कंत्राटी भरती महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेण्यात आलेला निर्णय होता असे म्हटले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी प्रतिउत्तर दिले असून त्यांनी फडणवीसांवर सडकून टीका केली आहे.  ज्यावेळी ही कंत्राटी भरती काढली गेली त्यावेळी उपमुख्यमंत्री कोण होते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार काय करत होते. असा प्रश्न फडणीसांना विचारला आहे.

विद्या चव्हाण पुढे म्हणाल्या की, आज देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्यापासून ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या पर्यंत शासन निर्णय (GR) कोणी काढले ते रद्द कसे केले  हे सर्व सांगितलं पण त्यावेळी जे सत्तेत होते आणि आज जे सत्तेत तुमच्यासोबत आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काहीच बोला नाहीत. तुम्ही या सर्व गोष्टींच खापर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय शरद पवार साहेब यांच्या वरती फोडण्यापेक्षा त्यावेळी जे मंत्रिमंडळात होते. ते आज तुमच्या सोबत आहे. त्यांचे नाव तुम्ही का घेतले नाही असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित केला. आज तुम्ही तीन वर्षांसाठी  पोलीस कंत्राटी पद्धतीने नेमणार आहात त्या पोलिसांना तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी राबवून घेणार आहात का? असा प्रश्न विद्याताई चव्हाण यांनी फडणीसांना विचारला आहे.

चव्हाण म्हणाल्या की, आर. आर. पाटील सत्तेत असताना  पोलिसांची भरती करण्यात आली होती. आणि त्याच्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्या काळातही पोलीस भरती करण्यात आली होती. आता पर्यंत महिलांना पोलीस भरतीत जास्तीत जास्त संधी देण्याचे काम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांनी केले आहे. आणि हे सर्व तुम्ही विसरत आहात का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला.

चव्हाण पुढे म्हणाल्या की, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहितदादा पवार दसऱ्यापासून युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. त्यामुळेच या सरकारची चिंता वाढल्याचं दिसत आहे. म्हणूनच आज देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीच खापर हे महाविकास आघाडी सरकारवर फोडलं आहे. महाविकास आघाडीने सत्तेत असताना जी कंत्राटी भरती केली आहे. त्याचा एकदा आढावा घ्या असेही विद्याताई चव्हाण म्हणाल्या आहेत.

युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून रोहितदादा पवार  यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण सामील होणारं आहेत. सरकारला माहिती आहे. त्यांनी बेरोजगार तरुणांसाठी कोणतेही पाऊल उचललेले नाही. त्यामुळे या सरकारची चिंता वाढली असे विद्याताई चव्हाण म्हणाल्या आहेत.

नारायण राणे यांच्यावर निशाणा साधत विद्याताई चव्हाण म्हणाल्या की, नारायण राणे मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत. मराठ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर नारायण राणे स्वतः बोलत नसून भाजप त्यांना बोलायला भाग पाडत आहे. सद्या इंग्रजांसारखी राजनीति मराठ्यांमध्ये भाजप करत आहे.

यामध्ये ओबीसींच आरक्षण कमी असं काही नसून तुमचं केंद्रात सत्तेत असताना आरक्षणाचा विषय का सुटत नाही. हा राज्य सरकारचा विषय नसून हा केंद्र सरकारचा विषय आहे. परंतु केंद्र सरकार मराठ्यांना आरक्षण देणार नाही. कारण मंडल आयोगाने २७% आरक्षण ओबीसींना दिलं आहे.  त्या गोष्टीला विरोध भाजपकडून करण्यात आला होता. आता ओबीसींना भडकवण्याचे काम भाजपकडून करण्यात येत आहे. ते मराठ्यांना देखील भडकवण्याचे काम करत असून मराठ्यांमध्ये ९६ कुळी असं करून मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. भाजप सरकार केंद्रात असताना तुम्ही ५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा उठवत नाही तुम्ही  ट्रिपल इंजिन सरकार ही  ५० टक्के मर्यादा उठवण्याबाबत तुम्ही मोदी सरकारकडे कधी जाणार असा प्रश्न विद्या चव्हाण यांनी फडणवीसांना विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कंत्राटी भरतीचा निर्णय उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातीलच – Dhananjay Munde

Mahua Moitra : अदानींना टार्गेट करण्यासाठी महुआ मोइत्राचा वापर करण्यात आला – दर्शन हिरानंदानी

चंद्रपूरच्या विकासासाठी येणा-या प्रश्नांना प्राधान्य देणार – राहुल नार्वेकर