कंत्राटी भरतीचा निर्णय ज्या मंत्र्यांनी घेतला त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – Supriya Sule 

Supriya Sule – आज राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरला पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की,भारतीय जनता पक्षाबदल (BJP) हसावं आणि त्यांच्या या केविलवाण्या प्रयत्न बद्दल काय बोलावं हा प्रश्न मला पडला आहे. माझी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विनम्र विनंती आहे की, आपण सगळ्या वृत्तवाहिन्यांवर पाहतच असाल. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाचा परिणाम तेथील सामान्य नागरिकांवर होत आहे. अनेक ठिकाणी तर हिंसा जनक परिस्थिती आहे. त्यात भाजपचे कार्यकर्ते यांच्यात देखील वाद झाल्याचं कळतंय. या संपूर्ण गोष्टीची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी सुप्रिया  सुळे यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गृहमंत्री महाराष्ट्राचे नसून भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगायला हवं की , आपण सत्तेत आहोत. सत्तेत असणारा पक्ष जर अशा पद्धतीची वागणूक महाराष्ट्रात करत असेल आणि त्यामुळे  कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येत असेल आणि हे सर्व काम जर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना झेपत नसेल तर त्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांना सांगावं आम्हा सर्व खासदारांना बोलवाव महाराष्ट्राच्या सुरक्षेचा तोडगा काढावा असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

सुळे यावर सविस्तर बोलताना म्हणाल्या की,भारतीय जनता पक्ष जे आंदोलन करत आहेत ते फक्त शरद पवार साहेब यांच्या विरोधात आहे. २०११ ते २०२१ च्या कंत्राट भरतीच्या जीआरच्यावेळी शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते.  कॅबिनेटमध्ये देखील नव्हते. आणि त्यावेळी त्या ठिकाणी एकनाथ शिंदे, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, उदय सामंत, धनंजय मुंडे, शंभुराजे देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, हसन मुश्रीफ हे सर्व त्यावेळी उपस्थित होते. शरद पवार साहेब यांचा काहीही संबंध नाही. माझी देवेंद्र फडणवीस आणि सरकारला विनंती आहे की, ज्यांच्या सहीमुळे हा निर्णय झाला तुम्ही त्यांचे राजीनामे घ्या. आणि या गोष्टीला माझा वैयक्तिक रित्या तुम्हाला पाठिंबा आहे.  मला खात्री आहे की देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष याचा न्याय मला नक्की देतील अशी माझी इच्छा आहे.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सरकारने वाढत्या प्रदूषणाबद्दल लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे. आणि महत्वाचं म्हणजे राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री खाजगी विमानाने पालकमंत्री ठरवण्यासाठी दिल्ली दरबारी जाऊ शकतात पण नांदेडमध्ये घडलेल्या अतिशय वाईट दुर्घटनेच्या ठिकाणी आढावा घेण्यासाठी रुग्णांची विचारपूस करण्यासाठी जाऊ शकत नाही ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट असून हे अस्ववेदनशील खोके सरकार आहे. भाजप फक्त पक्ष आणि घर फोडण्याचे काम करत आहे असेही यावेळी सुप्रियाताई सुळे म्हणाल्या

कॉंग्रेस, राष्ट्रवादी सरकारने आपल्या कार्यकाळात कधीही कंत्राटी तत्वावर कार्यकारी पदे भरली नव्हती. कंत्राटी पद्धत कुणी सुरु केली याचा शोध भाजपाने जरुर घ्यावा. राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांनी संघटीतपणे केलेल्या विरोधापुढे हे सरकार झुकले आहे. आता आपले अपयश लपविण्यासाठी माफिनाम्याचे खूळ भाजपाने काढले आहे. उपमुख्यमंत्री महोदयांना जुने संदर्भ काढून आपल्या चुकांचे खापर दुसऱ्यांवर फोडायची खोड आहे .

उगाच वडाची साल पिंपळाला लावण्याचे उद्योग करण्यापेक्षा ज्यांच्या मांडीला मांडी लावून सरकार चालविता त्यांच्याशी दोन शब्द बोलून घेतले असते तरी आपण हे ‘हवाबाण’ सोडण्याची हिंमत केली नसती, असा टोला सुप्रियाताई सुळे यांनी लगावला. कंत्राटी भरतीचा निर्णय२०११  व २०२१ सालच्या मंत्रिमंडळाने केला म्हणायचं आणि दुसरीकडे त्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांसोबत सत्ता उपभोगायची. या स्वार्थासाठी राजकीय पोळी भाजण्याच्या भाजप वृत्तीचे कार्ड महाराष्ट्राच्या जनतेपुढे मुळीच चालणार नाही.असेही  सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

कंत्राटी भरतीचा निर्णय उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातीलच – Dhananjay Munde

Mahua Moitra : अदानींना टार्गेट करण्यासाठी महुआ मोइत्राचा वापर करण्यात आला – दर्शन हिरानंदानी

चंद्रपूरच्या विकासासाठी येणा-या प्रश्नांना प्राधान्य देणार – राहुल नार्वेकर