“मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे’ – सुबोध भावे आणि मधुरा वेलणकर यांची नवीन शॉर्ट फिल्म प्रदर्शित

मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे : काही फिल्म्स असतात तर काही अर्थपूर्ण फिल्म्स असतात. कधी नुसत्याच जाहिराती असतात तर कधी सामाजिक आशयाच्या, अर्थपूर्ण जाहिराती असतात.गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर टीझरच्या माध्यमातून चर्चेत असलेली एक अर्थपूर्ण,प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी सकस शॉर्ट फिल्म नुकतीच सोशल मीडिया माध्यमाद्वारे कॉटनकिंग यांनी सादर केली आहे,ती म्हणजे ‘ मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे’ (Mi Mogambo Ani Kande Pohe).

मोगॅम्बोच्या भूमिकेत अभिनेते सुबोध भावे यांनी चाबूक परफॉर्मन्स केला आहे तर अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम यांनी त्यांच्या बायकोची भूमिका सूक्ष्म जागा भरत प्रभावीपणे बजावली आहे. गंगुबाई फेम सलोनी दैनी या शॉर्ट फिल्मद्वारे मराठीत खणखणीत पदार्पण करत आहे तर अभिनेता अनिरुद्ध देवधर याने मोगॅम्बोच्या मुलाचे काम अचूक आणि सूक्ष्म तरल भावना तीव्रपणे मांडत खमंग फोडणीचे काम केले आहे. या चारही अभिनेत्यांनी त्यांच्या भूमिका सजग केल्या आहेत.

कॉटनकिंग अशा अर्थपूर्ण शॉर्ट फिल्म्स प्रेक्षकांपर्यंत कसे आणते हे पाहणे नेहमीच आश्चर्यकारक असते. या अत्यंत स्पर्धात्मक जगात जिथे प्रत्येकजण आपली उत्पादने विकण्यामागे लागलेला आहे, तिथे कॉटनकिंग आपल्याला अशा सुंदर संस्कृती आणि मूल्यांची सांगड घालणारे, प्रत्येक घरात असलेले मनाला भिडणारे शुद्ध विषय घेऊन आपल्या घरात आणि मनात जागा निर्माण करतो. त्यांच्या अशा सादरीकरणाने तो किती जबाबदार ब्रँड आहे हे प्रतीत होतं. कॉटनकिंग म्हणजे नव्या पिढीचा आवाज आणि अनुभवी पिढीचे महत्त्व यांची योग्य सांगड.

कॉटनकिंगचे संचालक कौशिक मराठे म्हणतात, “आम्ही समूल्य संस्कार आणि श्रीमंत संस्कृतीत वाढलो आहोत. म्हणूनच ज्या पद्धतीने नैतिक व्यवसाय करतो, तो आमच्या प्रेक्षकांशी जाहिरात किंवा शॉर्ट फिल्म माध्यमातून संवाद साधताना झळकला पाहिजे असा आमचा अट्टाहास असतो. हे केवळ व्यवसायाविषयी नाही, तर मूल्यांबद्दल अधिक आहे,हेच आम्हाला आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करायचे आहे.”

अद्भूत क्रिएटिव्हजने या शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते व्यावसायिक आणि अर्थपूर्ण गाभा यांचं एकत्रीकरण सहज करत एक उत्तम सादरीकरण मांडतात.या शॉर्ट फिल्मचे लेखन अभ्यासू लेखिका मोनिका धारणकर यांनी केले आहे तर हि शॉर्टफिल्म प्रसिद्ध जाहिरात चित्रपट निर्माता आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शक वैभव पंडित यांनी दिग्दर्शित केला आहे.

वैभव पंडित, संस्थापक आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर, म्हणतात, “ कंटेंट बनवणे महत्त्वाचे नाही तर दर्जेदार आणि अर्थपूर्ण कंटेंट बनवणे महत्त्वाचे आहे. आणि मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे’ हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. असे हुशार अभिनेते, एक समर्पित टीम आणि मुख्यत: कॉटनकिंग आणि त्याच्या टीमकडून मोठा पाठिंबा आणि स्वातंत्र्य मिळाल्याने आम्ही भाग्यवान आहोत.

एकूणच, मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे ही एक पॉवरपॅक मनोरंजन, जीवनाचा एक अविभाज्य विषय असलेली एक अर्थपूर्ण शॉर्ट फिल्म आहे. सोशल मीडियावर आवर्जून पाहावी. ही शॉर्ट फिल्म कॉटनकिंगच्या YouTube चॅनेल, Instagram आणि Facebook पृष्ठांवर उपलब्ध आहे.