माझ्याशी संबंध ठेव नाहीतर… महिलेच्या धमकीनंतर ठाकरे गटाच्या नेत्याने उचलले टोकाचे पाऊल?  

Sudhir More case : ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर सयाजी मोरे यांनी गुरूवारी ( ३१ ऑगस्ट ) घाटकोपर आणि विद्याविहारदरम्यान रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी सुधीर मोरे यांच्या मुलाने वकील नीलिमा चव्हाण यांनी वडिलांचा छळ केल्याचा आरोप करत रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, नीलिमा चव्हाण यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. पण, निलिमा चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. नीलिमा चव्हाण यांनी सुधीर मोरे यांना मानसिक त्रास दिल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला आहे. वकील सुबीर सरकार यांच्यामार्फंत दाखल केलेल्या याचिकेत खोट्या प्रकरणात गोवण्यात आल्याचं चव्हाण यांनी म्हटलं.

“माझ्याशी संबंध ठेवले नाहीतर आयुष्य संपवेन, अशी धमकी निलीमा चव्हाण यांनी मोरेंना दिली होती. मोरेंनी बोलणं बंद केल्यावर ब्लॅकमेल करण्याचं काम नीलिमा चव्हाण करत होत्या. आत्महत्येपूर्वी नीलिमा चव्हाण यांनी मोरेंना ५६ वेळा फोन केला होता. तसेच, व्हॉट्सअॅपवर मेसेज, ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल्स करण्यात आले होते. मोरेंनी चव्हाण यांना छळवणूक थांबवण्याची विनंती केली होती. पण, कोणतीही दया चव्हाण यांनी दाखवली नाही,” अशी बाजू सरकारी वकील इक्बाल सोलकर यांनी पोलिसांतर्फे मांडली आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलं आहे.
सुधीर मोरे विक्रोळी पार्कसाईट विभागात वास्तव्याला होते. त्यांनी आपल्या नगरसेवकपदाच्या कारकिर्दीत उल्लेखनीय कामगिरी करुन दाखवली होती.दांडगा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी या भांडवलाच्या जोरावर ते गेली अनेक वर्षे विक्रोळी पार्कसाईटमध्ये आपले वर्चस्व राखून होते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागात हमखास शिवसेनेचा नगरसेवक निवडून येत असे.

महत्त्वाच्या बातम्याः

‘देश, संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस, इंडिया आघाडी व राहुल गांधी यांची लढाई सुरु आहे’

वनडे विश्वचषकानंतर राहुल द्रविड सोडू शकतात प्रशिक्षकपद, बीसीसीआयला शोधावा लागणार नवा गुरू

“PM मोदींचे अपयश झाकण्यासाठी सनातन धर्माचा वापर”; उदयनिधींचा भाजपवर पलटवार