“PM मोदींचे अपयश झाकण्यासाठी सनातन धर्माचा वापर”; उदयनिधींचा भाजपवर पलटवार

Sanatana Dharma Controversy:  तमिळनाडूतील सत्तारुढ द्रमुक सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (Chief Minister M. K. Stalin) यांचा दिवटा पुत्र उदयनिधीने (Udayanidhi) सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. उदयनिधीने सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली होती. सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या रद्द केल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. आपण ते हटवावे लागेल. तसेच सनातनलाही नष्ट करायचे आहे.’ असे म्हटले होते. उदयनिधी यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना उदयनिधी यांनी भाजपवर पलटवार केला आहे.

भाजप नेत्यांनी माझ्या विधानाचा योग्य प्रकारे अर्थ घेतला नाही. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, हे सर्वांना माहिती आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सहकारी मणिपूर हिंसाचार तसेच भ्रष्टाचारापासून लक्ष विचलित करण्यासाठी सनातन धर्माचा वापर करत आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून भाजपची सर्व आश्वासने पोकळ ठरली आहेत. तुम्ही आमच्या कल्याणासाठी नेमके काय केले, असा प्रश्न भाजप सरकारविरोधात संपूर्ण देश एकजुटीने करत आहे. पंतप्रधान मोदींचे अपयश झाकण्यासाठी सनातन धर्माचा वापर केला जात आहे, अशी घणाघाती टीका उदयनिधी यांनी केली.

दरम्यान, आश्चर्याची बाब म्हणजे केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री फेक न्यूजच्या आधारे माझ्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. मंत्री पदावर असताना त्यांनी माझी बदनामी केली, म्हणून त्यांच्यावर फौजदारी खटले दाखल केले पाहिजेत. पण मला माहिती आहे की, अशा प्रकारे व्यक्त होणे ही त्यांची अस्तित्व टिकवण्याची पद्धत आहे. त्यांना जगण्याचा दुसरा मार्ग माहिती नाही, म्हणून कायदेशीर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे उदयनिधी यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या-
Jalana Lathi Charge : देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा केला म्हणून तर माफी मागितली :– नाना पटोले
‘तीन अडकून सीताराम’चा अनलिमिटेड धिंगाणा; चित्रपटाची उत्कंठा वाढवणारा टिझर प्रदर्शित
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – Eknath Shinde