वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली, आदित्य ठाकरेंची आली प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर : अहमदनगर येथे औरंगजेबाचे पोस्टर दाखविल्याने उडालेला गोंधळ, राज्यात या कारणामुळे होणाऱ्या दंगली या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथील भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीस वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शनिवारी भेट दिली. या भेटीमुळे सर्वच स्तरातून अतिशय संतप्त अशा प्रतिक्रिया येत आहेत. आंबेडकरांच्या कृतीवरून विरोधक ठाकरे गटाला देखील लक्ष्य करत असून हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अशातच आता या प्रकरणावर ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या औरंगजेब कबरीला भेट देऊन फुलं वाहण्याच्या कृतीविषयी विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले, “मला आत्ताच माध्यमांकडून ही माहिती कळते आहे. मला त्याची माहिती घेऊ द्या आणि मग मी त्यावर बोलेन.”