आम्ही आमच्या आघाडीचे नाव बदलतो, पण.. सुप्रिया ताईंनी केली सरकारला हात जोडून विनंती 

Renaming India to Bharat : येत्या 18 सप्टेंबरपासून 22 सप्टेंबरपर्यंत संसदेचं विशेष अधिवेशन असणार आहे. यात विविध विधेयकं मांडली जाणार आहेत. यात राज्यघटनेत मोठा बदल करण्याचा प्रस्ताव मांडला जाणार असल्याची माहिती आहे. देशाच्या राज्यघटनेतील ‘इंडिया’ हा शब्द हटवला जाण्याची शक्यता आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात हा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे.

या सगळ्या चर्चेत आता खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) मोदी सरकारला (Modi Government) हात जोडून विनंती केली आहे. आम्ही हवं तर भारत नाव ठेवतो पण जनतेच्या डोक्यावर १४ हजार कोटींचा बोजा टाकू नका असं त्यांनी म्हटलं आहे. आम्ही आमच्या आघाडीला इंडिया नाव दिलं. त्यामुळे आता जनतेच्या डोक्यावर १४ हजार कोटींचा बोजा येणार आहे. असं त्या म्हणाल्या. आम्ही इंडिया नाव दिलं कारण हे चांगलं नाव आहे. पण इतके घाबरले आमचे विरोधक की ते आता इंडियाचं भारत करणार आहेत. माझी भाजपाला हात जोडून विनंती आहे हवं तर आम्ही नाव भारत ठेवतो पण तुम्ही इंडिया नाव बदलून जनतेच्या डोक्यावर १४ हजार कोटींचा बोजा लादू नका असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

माझी भाजपाला विनंती आहे की १४ हजार कोटी हे आमच्या गरीब मायबाप जनतेचे आहेत. हे पैसे नाव बदलण्यासाठी खर्च करु नका. १४ हजार कोटींमध्ये सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी देता येईल आजच्या अडचणीच्या काळात. १४ हजार कोटींमध्ये भारतात रुग्णालयं बांधता येतील. १४ हजार कोटींमध्ये देशभरात शाळा उभारल्या जातील. १४ हजार कोटींचा खर्च नाव बदलण्यासाठी येणार आहे असं मी वर्तमानपत्रात वाचलं त्यामुळे मोदी सरकारला आणि भाजपाला आवाहन करते आहे की जनतेचे हे पैसे फक्त नाव बदलण्यासाठी खर्च करु नका.

महत्त्वाच्या बातम्याः

‘देश, संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस, इंडिया आघाडी व राहुल गांधी यांची लढाई सुरु आहे’

वनडे विश्वचषकानंतर राहुल द्रविड सोडू शकतात प्रशिक्षकपद, बीसीसीआयला शोधावा लागणार नवा गुरू

“PM मोदींचे अपयश झाकण्यासाठी सनातन धर्माचा वापर”; उदयनिधींचा भाजपवर पलटवार