Sunetra Pawar | पहिल्यांदाच लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Sunetra Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी काल पत्रकार परिषदेत केली. लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. आज मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सुनील तटकरे यांचे आभार मानेन, असे त्या म्हणाल्या. तसेच पुढे सुनेत्रा पवार (Sunetra Pawar ) म्हणाल्या, सोबतच प्रफुल भाई, जानकर साहेब या सर्वांचेच मी आभार मानेन कारण त्यांनी मला काम करण्याची संधी दिली.

मतदारसंघामध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. जिथे जाईल तिथे कार्यकर्ते उत्साहाने आणि जल्लोषाने स्वागत करत आहेत. नरेंद्र मोदींचा जो विकासाचा मुद्दा आहे त्याच मुद्द्याला धरून दादाही काम करत आहेत, असे त्यांनी म्हटले. बारामती तालुक्यात दादांनी जो काही विकास केला आहे तोच अखंड महाराष्ट्रावर करण्याचा मानस आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल