Dahihandi : मुंबईत भाजपकडून तब्बल ४०० ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन

वरळीतील जांबोरी मैदानातून परिवर्तनाची दहीहंडी

Dahihandi : महायुती सरकारच्या काळात दणक्यात हिंदू सण साजरे होत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई भाजपातर्फे ४०० हून अधिक ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातील जांबोरी मैदानातून परिवर्तनाची दहीहंडी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. त्याचबरोबर मुंबई भाजपाकडून ४५० मंडळांच्या २५ हजार गोविंदांना १० लाखाचे विमा कवच देण्यात आले आहे.

याखेरीज मुंबईतील भाजप नेते खासदार, आमदार, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागात मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे अशी माहिती मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली. वरळी जांबोरी मैदानावरील दहीहंडीचे पहिले बक्षीस ३ लाख ३३ हजार रुपये आहे. तर विजेत्यांना उत्कृष्ट पारितोषिक व सन्मान चिन्ह दिले जाणार आहे.

मुंबई भाजपाकडून विविध ठिकाणी दरवर्षी दहीहंडीचे आयोजन केले जाते. मुंबईतील सण उत्सव आणि परंपरा जपण्यासाठी भाजपाच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जातात. यंदाही भाजपकडून आयोजित सराव शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १५० हून अधिक गोविंदा पथक शिबिरात सहभागी झाले होते. प्रत्येकाने साधारण पाच ते सहा थर रचून सलामी दिली. प्रत्येक पथकाला बक्षिसाने गौरवण्यात आले. मुंबईतील यंदाची दहीहंडी परिवर्तनाची असेल अशी आश्वासक प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

https://www.youtube.com/watch?v=vYoREvhKy0A

महत्त्वाच्या बातम्याः

हे तर एखाद्या शेंबड्या पोरालाही पटणार नाही; जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
देशात शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचं मोठं संकट, चुकीच्या लोकांकडे देशाचे नेतृत्व गेलेले आहे- शरद पवार
देश व लोकशाही वाचवण्याची लढाई केवळ काँग्रेसची नाही तर आपल्या सर्वांची: नाना पटोले
राज्यातील येड्याच्या सरकारने वीज महाग केली आहे, शेतीला आठ तासही विज मिळत नाही – Nana Patole